Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यंदा राज्यात भयंकर उन्हाळा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हवामान खात्याने येत्या ३  महिन्यांचा उन्हाळा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.

 

हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा तडाख्याचा उन्हाळा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील. अशात मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू शकतं.

 

गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही या वेळी जास्तीत जास्त तापमान नेहमीच्या वर जाईल. त्याशिवाय कोकण गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल.

 

आनंद शर्मा पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. २००६ नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत आहे. ते म्हणाले की, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता. परंतु आता त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Exit mobile version