म्हसावद शिवारातील शेतातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद शिवारातील शेताच्या बांधावरून एका तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अविनाश जगदीश खेडकर (वय-२५) रा. रेल्वे कॉलनी, म्हसावद ता. जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. अविनाशचे वडील जगदीश खेडकर हे १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता म्हसावद शिवारातील जयसिंग राजपूत यांच्या शेतात मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ एटी ९२५२)ने गेले होते. त्यावेळी शेतातच्या बांधावर त्याने मोटारसायकल पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली. त्यांनी मोटारसायकलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मिळाली नाही. अखेर अविनाश खेडकर यांनी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content