Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हसावद येथील विवाहितेचा ५ लाखासाठी छळ; एमआयडीसी पोलीसात पतीसह सासूवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला घर घेण्यासाठी ५ लाख रूपये माहेरहून आणावे यासाठी पतीसह सासरच्यांकडून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पतीसह सासू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, रिता अनिकेत पवार वय २८  रा. तुलसी विहार पनवेलकर, रॉयल कोर्स, बदलापूर मुंबई ह.मु. म्हसावद तालुका जि. जळगाव यांचा विवाह अनिकेत नितीन पवार रा. बदलापूर मुंबई यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती अनिकेत पवार यांनी आपल्या रिता पवार यांच्याकडून माहेरहून ५ लाख रुपये आणावे म्हणजेच घर घेता येईल या कारणासाठी शिवीगाळ करणे, मारहाण करणे हा छळ सुरू केला. यासाठी सासू लताबाई नितीन पवार यांनीदेखील मुलाचे कानभरवून विवाहिता रिता पवार यांचा छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्यात. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीसात शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पती अनिकेत नितीन पवार आणि सासू लताबाई नितीन पवार यांच्याविरोधात शारीरिक छळ व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Exit mobile version