Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हसवे येथे बसच्या अपघातात तीन प्रवासी जखमी

Accident

पारोळा प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्याजवळ पुढे जाणाऱ्या वाहनाला बसने धडकेत बसमधील तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. तर बसचे नुकसान झाले. याबाबत बस वाहक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा लोणी मार्गे कसोदा बस क्रमांक (एमएच 20 बीएल 2502) हिने पुढे चालणारा एका आयशर वाहनाला मागून धडक दिली. धडकेत बसमधील तीन प्रवासी हे जखमी झाले. तर बसचे पुढील काचा फुटून नुकसान झाले. वाहक संदीप पवार यांनी फिर्यादीवरून बसचालक प्रदीप काशिनाथ पाटील रा.नांदूखुर्द ता.एरंडोल या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार विजय भोई करीत आहे.

Exit mobile version