Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हणे…अकरा रूपयांचे ताईत करेल कोरोनापासून बचाव ! : भोंदू बाबा अटकेत

लखनऊ वृत्तसंस्था । अकरा रूपयात कोरोनापासून बचाव करणारे ताईत विकणार्‍या अहमद सिद्दीकी या बाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे.

कोरोनामुळे अनेक गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहेत. एक तर यामुळे अफवा मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येत असून याच्या जोडीला काही धुर्त लोक याचा व्यवसायासाठी लाभ करून घेतांनाही आढळून येत आहेत. अशीच एक घटना लखनऊ येथे उघडकीस आली आहे. येथे अहमद सिद्दीकी या भोंदू लोकांना कोरोनापासून बचाव करण्याचा दावा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अकरा रूपयांचे तावीज (ताईत) घातल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नसल्याचा दावा करत त्याने जाहिरातबाजी सुरू केली होती. यावरून त्याच्या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी अहमद सिद्दीकीला अटक केली आहे.

Exit mobile version