Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“म्युकरमायकोसिस’ ग्रस्त पाच रुग्णांना डिस्चार्ज

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शनिवार, दि १७ जुलै रोजी म्युकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या ५ रुग्णांना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते डिस्चार्ज कार्ड देऊन रूग्णालयातून निरोप देण्यात आला. 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये दाखल झालेले पाच रुग्ण सी-२ या कक्षामध्ये उपचार घेत होते. त्यांना म्युकरमायकोसिस आजारामुळे गंभीर अवस्थेत उपचार सुरु होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर यशस्वी उपचार करीत त्यांना बरे केले आहे. या रुग्णांचे लाखो रुपयांचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहे.  उपचार करणेकामी म्युकरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष डॉ.मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा.डॉ.विजय गायकवाड, दंत शल्य विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, डॉ.हितेंद्र राउत, सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.किेशोर इंगोले आदींनी परिश्रम घेतले. तसेच सी २ कक्षाचे इन्चार्ज अधिपरिचारिका वैशाली पाटील, प्राजक्ता कांबळी, गिरीश बागुल, पूजा वायल, माधुरी सुरवाडे, प्रियांका मेढे, सुरेखा परदेशी, गायत्री बहिरम, अनुजा कदम, अंकित बनकर यासह कंत्राटी कर्मचारी प्रफ्फुल नेरकर, मयुर महाजन, शंकर सोनवणे, अमोल तायडे, संतोष चौधरी आदींनी रुग्णसेवेसाठी सहकार्य केले.

Exit mobile version