मौजे धाबे येथे ‘ युवा उद्योजक मनोज कौतिकराव पाटील वाचन कट्टा ‘ चे उद्धघाटन

 

पारोळा, प्रतिनिधी । शहरातील युवा उद्योजक मनोज कौतिकराव पाटील यांनी धाबे ता. पारोळा या आदिवासी गावात सहा बाक , बोर्ड , पुस्तक रॅक , पायाच्या दाबाने चालणारे सॅनिटायझेशन यंत्रासह पेपर व पुस्तके उपलब्ध करून देवुन शाळेकडुन देशभरातील पहिला मुक्त, मोफत , विनाखर्च, विना शुल्क वाचन कट्टा निर्माण करून विद्यार्थी व ग्रामस्थांना ज्ञार्नाजनाची उत्तम सुविधा निर्माण केली आहे .

जि. प. प्राथमिक शाळेचे राज्य शिक्षक तथा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून वाचन कट्टा सुरु करण्यात आला आहे. याबाबत मग शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी युवा उद्योजक मनोज कौतिकराव पाटील यांच्या सहकार्याने प्रारंभ झालेल्या शाळेकडुन विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारा , मुक्त, मोफत , विना शुल्क , विना खर्च येणाऱ्या वाचन कट्टा उपक्रमाचे उद्धघाटन ज्येष्ठ नागरिक मोहन फकिरा भिल यांच्या हस्ते करण्यात आले.

याठिकाणी सुंदर बैठक व्यवस्थे बरोबरच वृत्तपत्र व वाचनीय ज्ञानवर्धक पुस्तके सदैव उपलब्ध राहणार आहेत. सध्या कोरोनाच्या धरतीवर येथे पायाच्या दाबाने चालणारे हॅन्ड सॅनिटायझर यंत्र , दिवसातुन तीन वेळा बाक सॅनेटाईज व फिजिकल डिस्टन पाळत आळीपाळीने वाचनाचा लाभ व आनंद घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक साळुंखे यांनी दाते मनोज पाटील यांचे कौतुक व अभिनंदन करून आभार मानले. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य अशोक भिल , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल, आदिवासी रक्षक समिती महाराष्ट्र राज्याचे तालुकाध्यक्ष रविंद्र भिल कपिल सदाशिव चौधरी, पारोळा तालुकाध्यक्ष शिव छावा संघटना , भागवत आधार चौधरी, सुरेश वना चौधरी, चित्रा पाटील, सिद्धराज साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ शारिरीक अंतर नियम पाळत उपस्थित होते . शेळावे केंद्र प्रमुख बी. आर. पारधी यांनी शुभेच्छासह अभिनंदन केले आहे.

Protected Content