Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाइल हिसकावून दुचाकीस्वार फरार; पोलीसात गुन्हा

mobilechorirp

जळगाव प्रतिनिधी । हातातील मोबाइल कानाला लावून रस्त्याने मित्राला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाच्या हातातून मागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना २१ रोजी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद राजेंद्र सुर्यवंशी (वय-२३) रा. नितीन साहित्यानगर, सागर आपार्टमेंट तरूण २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास काम आटोपून मित्र रितेश कोळी याला भेटण्यासाठी हॉटेल सुमेरसिंग ढाब्याजवळ मोबाईलवर बोलत असतांना पाठीमागुन दुचाकीवर दोन अज्ञात भामट्यांनी उजव्या हाताला झटका देवून हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून कुसुंबा गावाकडे फरार झाले होते. थोड्या अंतरावर जावून एका व्यक्तीचा देखील पायी जात असतांना त्यांचाही हातातून मोबाईल हिसकावून या दोन्ही चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. दरम्यान दोन जणांचे मोबाईल चोरून नेणारे एकच असल्याचे संशय आहे. याप्रकरणी प्रमोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Exit mobile version