Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारच्या भूमिकेवर माजी लष्करप्रमुखांचे प्रश्नचिन्ह

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी ट्विट केलं असून देशात रोज कोरोनामुळे मृत्यू होणारी संख्या दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धातील शहिदांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे.

 

“आपल्या देशात सध्या युद्ध सुरु आहे. १३३८ भारतीयांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याआधी ११८२ जणांचा झाला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा ही संख्या अडीच पट जास्त आहे. देशाने या युद्धावर लक्ष केंद्रीत केलं आहे का?,” अशी विचारणा वेद प्रकाश मलिक यांनी केली आहे.

 

 

देशातील वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० बाधित रुग्ण आढळून आले असून १ हजार ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी देशात  दुसरी लाट आलेली असतानाही सध्या सुरु असलेल्या निवडणूक प्रचारसभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीका केली असून परखड मत मांडलं आहे.

 

 

 

वेद प्रकाश मलिक यांनी देशात सध्या पश्चिमं बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या प्रचारसभा, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर कित्येक महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन यांचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारसभा, धार्मिक कार्यक्रम, शेतकरी आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी देशाला जागं होण्याचं आवाहन केलं आहे. देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

Exit mobile version