Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

 मुक्ताईनगर , प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर शहर व तालुका काँग्रेसतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने प्रवर्तन चौकामध्ये शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मोदी सरकारच्या विरोधात त्यांच्या अघोषित आणीबाणीविरुद्ध शपथ घेण्यात आली.

निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, माध्यमे यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे चुकीचे धोरण केंद्र सरकार राबवित असल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीव्र घोषणा देऊन निषेध करण्यात आला. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घटनेतील लोकशाही मूल्ये जोपासण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.जगदिश पाटील,मागासवर्गीय जिल्हाउपाध्यक्ष बी.  डी. गवई, शरद महाजन, दिनेश पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा. पवन खुरपडे, अँड.अरविंद गोसावी, भाऊराव महाजन, व्ही. आर. महाजन, प्रा. सुभाष पाटील, अँड. राहुल पाटील, रमेश बारी, निखिल चौधरी, राजुभाऊ जाधव ,युवक विधानसभा अध्यक्ष निरज बोराखेडे, निलेश भालेराव, राजू वानखेडे, लुकमान खान, फारूक खान, अनिल सोनवणे, आनंदा कोळी, अमोल जैन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version