Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी-शाह खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे ; बी. जी. कोळसे पाटील यांचा खळबळजनक आरोप

b g kolse patil

बीड (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोघेही खुनी असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. ते बीडमध्ये आयोजित संविधान बचाव सभेत बोलत होते.

 

संविधान बचाव सभेत बोलतांना बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खुनी आहेत. ते खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत. मोदी-शाह यांच्यावर ‘मास मर्डर’चा गुन्हा आहे. याबाबत न्यायमूर्ती सावंत यांनी अहवालही दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक केस दाखल आहेत. सध्या न्यायव्यवस्था देखील दडपणात आहे. न्यायमूर्ती लोया प्रकरणात फडणवीस यांच्यावरही आरोप आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. सध्याच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष्य घालावं, अन्यथा मला या गृहमंत्र्यांविरुद्ध देखील आंदोलन करावे लागेल, असा इशारा नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, कोळसे पाटील यांच्या आरोपानंतर प्रचंड खळबळ उडाली असून भाजप काय प्रतिउत्तर देते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Exit mobile version