Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी-शाहांच्या क्लीन चीटचा तपशील उघड केल्यास जीवाला धोका : निवडणूक आयोग

shahmodi 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांत निर्दोष जाहीर करणाऱ्या निकालातील दुमताचा तपशील उघड करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीविताला धोका पोहोचू शकतो, असे कारण आयोगाने दिले आहे. विशेष म्हणजे मोदी आणि शहा यांना निर्दोष ठरवण्याची निर्णय प्रक्रिया नेमकी काय होती, हे उघड करण्यासही आयोगाने नकार दिला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष शाह यांच्या प्रचारसभेतील काही वक्तव्यांविरोधात काँग्रेस आणि अन्य काही विरोधी पक्षांनी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती. न्यायालयीन आदेशाच्या दडपणानंतर आयोगाने या तक्रारींची दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. परंतू मोदी आणि शहा यांना सर्वच प्रकरणांत आयोगाने बहुमताने निर्दोष ठरवले होते. त्यावेळी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मतभेद व्यक्त करणारा निकाल दिला होता. लवासा यांचा निर्णय आणि त्या निर्णयासाठी पुष्टी देणारा त्यांचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराखाली केली होती. परंतू माहिती उघड करून कोणाच्याही जीविताला वा शारीरिक इजा पोहोचण्याची भीती असेल, तर माहिती अधिकार कायद्याच्या ८(१)(जी) या कलमानुसार तपशील उघड न करण्याची मुभा आहे. आयोगाने हेच कारण देत माहिती देण्यास नकार दिला आहे.

Exit mobile version