Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींमुळेच बहुजनांचे राज्य – फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । बहुजनांचं राज्य  मोदींमुळे बघायला मिळत आहे असे प्रतिपादन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या जन  आशीर्वाद यात्रेच्या प्रारंभप्रसंगी केले

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन यात्रेला सुरुवात झाली . विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

 

“जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे. तसंही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जनाजनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्याप प्रति कृतज्ञता प्रगट करणार  आहे,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

“बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे,” असे फडणवीस म्हणाले.

 

“८० टक्के उद्योग हे राणे यांच्या खात्याअंतर्गत येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज सरकारच्या  नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झालं होतं. सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत होती, पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. ज्याप्रकारे सरकारी स्तरावर वसुली सुरू आहे त्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, जनतेसाठी संघर्षं केल्याशिवाय पर्याय नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जनतेचा आशा आकांक्षा मोदींपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहचवल्या जातील असेही फडणवीस म्हणाले

 

Exit mobile version