मोदींची मोठी घोषणा – २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार

नवी दिल्ली, वृत्तसेवा | गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात ‘गुरु पर्वा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’  साजरा केला जाणार आहे.

 

पंतप्रधान मोदींनी यापार्श्वभूमीवर रविवारी ट्विट करत म्हटले आहे की, गुरु गोविंद सिंग यांची जयंती, प्रकाश पर्वा निमित्त, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता भारत दर वर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करेल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले, ‘वीर बाल दिवस, हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांनी या देशासाठी बलिदान दिले आणि त्यांना भिंतीत जिवंत चिनून मारण्यात आले होते. या दोन महान व्यक्तींनी इतर कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी मृत्यू स्वीकारला होता. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, माता गुजरी देवी, श्री गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या चार साहिबजाद्यांचे शौर्य भारतातील कोट्यवधी लोकांना धैर्य देते. ही थोर माणसे अन्यायापुढे कधी झुकली नाहीत. आता लोकांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

Protected Content