Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींची पुन्हा शिवरायांशी तुलना, अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडे : संभाजीराजे

sambhaji raje 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच, केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून ‘तान्हाजी’ सिनेमातील दृश्ये मॉर्फ करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित व्हायरल करण्यात आली आहे. याआधी भाजपचे दिल्लीतील एक नेते जयभगवान गोयल यांनी मोदींची शिवरायांशी तुलना करणारे पुस्तकच प्रकाशित केले होते. या मुद्द्यावरून संभाजीराजे यांनी ‘आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या भावनांची कदर करून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version