Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : विवाहितेची पती व सासरच्या जाचाला कंटाळून संपविले जीवन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहीतेने बुधवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. मयताच्या माहेरच्या मंडळींनी आरोप करत पतिसह सासरच्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरूवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पतीसह सासूला ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, तांबापुरा येथील विवाहीता सना कौसर फिरोज शेख (वय-२२) या विवाहीतेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मयत विवाहीतेच्या माहेरच्या मंडळींनी समना कैसर या विवाहीतेच्या मृत्युबाबत शंका उपस्थीत करुन पती व सासूच्या जाचाला कंटाळून सना कौसर हिने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप करत सासारच्या मंडळींना अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच, गुन्हा दाखल करुन संशयीतांना अटक होणार नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला हेाता. तांआज सकाळ पासून सना कौसर हिच्या माहेरच्या मंडळींनी जिल्‍हारुग्णालयात गर्दी करुन संबधीतावर गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी माहेरच्या मंडळींची तक्रार नोंदवुन घेतल्यावर संशयीत पती फिरोज शेख युनूस शेख कुरेशी(वय-२५)जैलब शेख युनूस शेख कूरेशी (वय-४५) अशा दोघांना ताब्यात घेण्यात येवुन रितसर अटक करण्यात आल्यावर नातेवाईकांनी मृतदेहाच्या शवविच्छेदनाची परवानगी दिल्यावर शवविच्छेदन करण्यात येवुन मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Exit mobile version