मोठी बातमी : माझी वसुंधरा अभियानात राज्यातून चिनावल तिसऱ्यास्थानी(व्हिडिओ)

 सावदा, प्रतिनिधी । माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत चिनावल ग्रामपंचायतीने राज्यातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांक पटकावला आहे.  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला.

 

आज दि.  ५  जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री संजय बनसोडे, विभागाच्या आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  या अभियानात जळगाव जिल्ह्यातून चिनावल ता. रावेर या ग्रामपंचायतीने शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व त्या निकषांचे पालन करत गावात प्रदूषण मुक्त गाव, प्लास्टिक मुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत प्रकल्प, सोलर ऊर्जा स्त्रोत प्रकल्प, ई-लर्निंग शाळा व कोरोना काळ असूनही मोहीम चिनावल ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले, उपसरपंच,  ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे व सर्व संचालक मंडळ कर्मचारीवर्ग रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व सर्व अधिकारी वृन्दांच्या मार्गदर्शनाने राज्यभरातून ग्रामपंचायत विभागातील २९१  ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायतींची यातून निवड करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातून राज्यात चिनावल सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत क्रमांक तीन वर आल्याने उपस्थित मंत्री  सरपंच भावना बोरोले , ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे यांचे ऑनलाईन पद्धतीने अभिनंदन करून पुरस्कार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला चीनावल  ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच  भावना बोरोले , रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल सर्व सदस्य ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाची जुळले होते. चिनावल ग्रामपंचायत कार्यालयातून या सोहळ्यात सर्व सहभागी झाले होते. या आधीही ग्रामपंचायतीने वेळोवेळी राबविलेल्या अभियान असो वा पुरस्कार तसेच तंटामुक्ती अभियान असो यात नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे.  सरपंच भावना बोरोले यांच्या उत्कृष्ट कार्याने त्यांना स्वतः मानवाधिकार संघटनेच्या खानदेश रणरागिनी राज्यस्तरीय  नारी  रत्न पुरस्कार मिळाला आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार ही प्राप्त केला आहे .दरम्यान, आज माझी वसुंधरा या राज्यस्तरीय अभियानात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत विभागात ग्रामपंचायतीने केलेले उत्कृष्ट कार्याने पंचायतीला माझी वसुंधरा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाने  गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित सर्व मंत्री महोदयांनी चिनावल ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य या कार्यक्रमातून अभिनंदन केले. हा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातून चिनावल ग्रामपंचायतीला मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाच पण संपूर्ण जिल्हाभरातून पंचायतीचे व लोकनियुक्त सरपंच महिला असूनही सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. सदर कार्यक्रम ऑनलाइन असला तरी चिना्वल ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस पाटील निलेश नेमाडे,  तंटामुक्ती  अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले, ग्रामपंचायत सदस्य सागर भारंबे, कविता किरंगे, धनश्री नेमाडे व सर्व सदस्य हजर होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/475374087057081

Protected Content