Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालविले !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील तरूणा शेतकऱ्याच्या अंगावरून वाळूचे ट्रॅक्टर चालवल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सामवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी तरूण शेतकऱ्याचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जयवंत यशवंत कोळी (वय ३६) रा.भाल्या नाला परिसर, मांडळ ता. अमळनेर जि.जळगाव असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवारी १७ जानेवारी रेाजी सकाळी ७ वाजता जयवंत कोळी हा शेतात पाणी भरण्यासाठी जात होता. त्यावेळी समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येवून जयवंतला जोरदार धडक दिली. या अपघातात जयवंतच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान मयत जयवंत कोळी यांच्या पत्नी यांनी आरोपींचे नावे पोलिसांसमोर स्पष्ट केली आहे. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version