Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : जुने जळगावात दोन घरांना आग (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात सोमवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सुमारास एका पार्टेशनच्या घरामध्ये अचानक आग लागली. दरम्यान ही आग कशामुळे लागली ही माहिती अद्यापसमोर आलेले नाही. दरम्यान या आगेमुळे शेजारी असलेले पार्टिशनचे घराने देखील पेट घेतला. यामध्ये दोघी कुटुंबातील घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्वाची कागदपत्रे आदी सामान जाळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील अग्नीशमन अधिक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवि बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

दरम्यान,  सोनू बाविस्कर व लताबाई बाविस्कर यांचे येथे घरात देवघरात दिव्यामुळे घराला आग लागल्याचे समजते. या घराच्या आगीची पाहणी महापौर जयश्री महाजन यांनी करून कुटुंबीयांना सांत्वना दिली. याप्रसंगी माजी सभापती महिला व बालकल्याण खुशबूताई बनसोडे उपस्थित होत्या.

 

Exit mobile version