Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोकाट जनावराच्या धडकेत जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात मोकाट जनावरांचा मुक्तपणे संचार सुरु आहे. मागील अठवड्यात मोकाट गुरांनी एका प्रौढासं धडक देवून  जखमी केले होते. दुर्दैवाने त्यांचा रविवारी रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू ओढवला.

 

यावल शहरात मोकाट जनावरांमुळे  वाहनांचा अपघात झाल्याचे उदाहरणे आहेत.  गेल्या आठवड्यात येथील योगा योग पेठ मधील रहिवासी नथ्थु यशवंत पाटील (बारी)  (वय ५५ वर्षे)  यांना मोकाट गुराने जोरदार धडक मारल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.  आठवडाभर  एका खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असतांना रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले आहे.  या संदर्भात शहरातील विविध संघटनानी नागरिकांनी मोकाट गुरांबाबत अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रारी करून ही संबंधित प्रशासकीय विभाग दखल घेत नसल्याने शहरात प्रशासनाच्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बारी वाड्यातील नथ्थु यशवंत पाटील यांना २२  ऑगस्ट रोजी मोकाट गुराने जोरदार धडक दिली असता ते खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.  येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता २८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. मोकाट गुरे मालकांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी बारी यांच्या कुटुंबीयांकडून मागणी होत आहे. मयत पाटील यांचे पश्चात  पत्नी तीन मुले, एक मुलगा असा परिवार आहे. पाटील खाजगी कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबातील आधार गेला असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

 

अनेक वेळा तक्रारी

मोकाट गुरांबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. शहरात चौका –चौकात तथा रस्त्याने गुरांचे कळप मुक्तपणे संचार करत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. शहरालगत असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे तर नित्याची बाब आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी येथील पोलीस निरीक्षक यांचे समवेत शेतकऱ्यांनी बैठक घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती.  तक्रार केल्यानंतर गुरे मालक चार दिवस गुरांना बांधून ठेवतात. त्यानंतर पुन्हा जैसे थे! यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी शहरातून मागणी होत आहे.

Exit mobile version