Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोकाट जनावरांनी घेतला वृद्धाचा बळी ; नगर परिषदेविरोधात नागरिकांमध्ये रोष

यावल  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  शहरात मोकाट जनावरांचा त्रास ओढला आहे.  काल मोटरसायकमध्ये अचानक मोकाट जनावर आल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे.  नगर परिषदेने या घटनेचे गांभीर्य ओळखून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

 

यावल शहराच्या प्रमुख मार्गावर मोकाट गुर , डुकर आणि  कुत्र्यांचा वावर वाढल्याने पादचारी व मोटर वाहनांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. प्रसंगी मोकाट जनावरे हे वाहनात घुसत असल्याने अपघात होवुन शहरात दोघांनी आपला जिव गमावला आहे. तरी  देखील यावल नगर परिषद प्रशासना या गंभीर प्रश्नांकडे  लक्ष देत नसल्याची नागरीकांची तक्रार आहे. नगर परिषदच्या अक्षम्यः दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील प्रमुख मार्गापासुन तर विस्तारीत वसाहती मधील मार्गापर्यंत सर्वत्र मोकाट जनावरे फिरतांना दिसुन येत आहेत. यावल स्टेट बँक समोरील मार्गावर अशाच प्रकारे मोकाट फिरणारे जनावर वाहनात घुसल्याने काल शनिवार दि.  १५  ऑक्टोबर रोजी शिरपुर तालुक्यातील अशोक चव्हाण वय ७० वर्षाच्या वयोवृद्ध व्याक्तीचा जिव गेल्याची घटना घडली आहे.  या आधी  शहरातील महाजन गल्ली परिसरात मागील एक महीन्यापुर्वीच बारी वाड्यातील नथ्यु बारी या मजुराला  मोकाट गुराने धडक दिल्याने ते  गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान  त्यांचा  मृत्यू ओढवला होता.

यावल नगर परिषद कडे मोकाट गुरेढोर, मोकाट कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मागणी वारंवार नागरीकांनी केली असतांना नगर परिषद प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देत नसल्याने शहरवासीयांमध्ये प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तरी नगर परिषद  पुन्हा या मोकाट जनावरांच्या  प्रश्नाकडे  दुर्लक्ष न करता तात्काळ या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा व पुनश्न या जनावरांमुळे तिसरा निरपराध व्याक्तीचा बळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा नागरीकांकड्डन व्यक्त करण्यात येत आहे

 

Exit mobile version