Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मैदानी स्पर्धेत जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंना यश 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोनेरे अंतर्गत जळगाव झोनल आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम जळगाव येथे घेण्यात आल्या.

सदर स्पर्धेमध्ये जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाची खेळाडू हेमांगी चौधरी (BE Comp) हिने महिला गटात 100 मी व 400 मी धावणे या क्रीडा प्रकार मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच लांब उडीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच दीपक कोळी याने 800 मी धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला, खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा विकास महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले.

संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उल्हासशेट चौधरी, प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. डी.नारखेडे यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचेअभिनंदन केले व पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version