मेहुल चोक्सीच्या अपहरणाचे पुरावे नाहीत ; अँटिग्वाच्या पंतप्रधानाचा खुलासा

 

 

लंडन : वृत्तसंस्था । भारतातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या अपहरनाबद्दल  अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन  म्हणाले   की त्यांना चोक्सीच्या अपहरणाचा कोणताही पुरावा मिळाला नसला तरी   चर्चा लोकांमध्ये आहे

 

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्यानंतर भारतातून पळून गेले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडाचे नागरिकत्व घेतलं होतं.

 

संसदेतील विरोधी पक्षातील खासदारांनी पंतप्रधान ब्राऊन यांना स्कॉटलंड यार्ड किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेला मेहुल चोक्सीच्या अपहरणाशी संबंधित पुरावे सापडले आहेत का असा प्रश्न विचारला होता. यावर “मला पुराव्यांची माहिती नाही परंतु मेहुल चोक्सी याचे अपहरण झाले असल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातून मिळाली आहे. मला माहित आहे कायदेशीर संस्थानी याचा तपास केला असेल आणि त्यांच्याकडे काही संशयास्पद माहितीदेखील असेल. मात्र मला ठोस पुराव्यांविषयी माहिती नाही,” असे पंतप्रधान ब्राऊन यांनी सांगितले.

 

“ज्या बोटीमध्ये मेहुल चोक्सीचे काथित अपहरण झाले, ती अँटिग्वामध्ये कायदेशीररीत्या आणली होती. त्या बोटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत मला माहिती नाही. आपल्याला तर हे माहित आहे की, कॅरिबियन क्षेत्राच्या सीमा कमकुवत आहेत आणि त्याच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे पुरेसे लोक नाहीत,” असे ब्राऊन म्हणाले.

 

चोक्सीचे वकिलांनी असा दावा केला होता की, मेहुल चोक्सी स्वतः अँटिगाहून डोमिनिकाला गेला नव्हता तर त्याचे अँटिगा येथून अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आलं. कायद्याच्या नियमांचे आणि मूलभूत हक्कांचे भयंकर उल्लंघन केल्याचे म्हणत चोक्सीचे वकिल मायकल पोलॉक यांनी हा भयानक प्रकार आहे असे म्हटले होते. मालमत्तेचे आमिष देऊन त्याचे अपहरण झाले. त्याच्या डोक्यावर एक बॅग ठेवली होती. त्याला मारहाण करत जबरदस्तीने बोटीवर बसवले आणि बेकायदेशीरपणे दुसर्‍या देशात नेण्यात आले असे त्यांनी सांगितले.

 

Protected Content