Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण येथे मस्जिदमध्ये नमाज अदा करून राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे  उघडण्यास परवानगी मिळाल्याने आज गुरूवार ७ ऑक्टोबर पासून मंदिरे, मशिदी उघडण्यात आले आहेत. यात मेहरूण येथील  मस्जिद देखील भाविकांसाठी उघडण्यात आली.

 

आजपासून मशिदी उघडण्यात आल्यामुळे परमेश्वरचे आभार व्यक्त करण्यात आले.  कोरोना या भयंकर आजारमुळे संपूर्ण जग हैराण व  त्रस्त झाले होते. आज अनेक महिन्यापासून राज्य शासनाच्या निर्द्शाने बंद  बंद पडलेली मशिदी  उघडण्यात आली. याचे  मेहरूण येथे  मस्जिद उमर ट्रस्ट व नमाजी लोकांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना करून आभार व्यक्त केलेत. तसेच महाराष्ट राज्य शासना ने मशिदी उघडण्याची परवानगी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आले व शासनाचे अभिनंदन ही करण्यात आले. यावेळी मस्जिदे उमर ट्रस्टचे अध्यक्ष हुसेन खान मुलतानी, अन्वर खान मुलतानी,  इनयात जनाब, रज्जाक खान, शाकिर मुलतानी, मौलाना एजाज, मुन्ना भाई, युसूफ खान बटाटेवाले, रौफ शेख,  ज हूर शेख, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.

Exit mobile version