Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण येथील तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण नगरातील महाजन नगरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ मे रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश सुकराम गायकवाड (वय-३२) रा. महाजन नगर, मेहरूण, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सकाळी १० वाजता लक्षात आला. त्याने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर बुधवारी ४ मे रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Exit mobile version