मेहरूण परिसरात मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस आणि गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय आयुष रूग्णालयातर्फे रामेश्वर कॉलनी परिसरातील श्रीराम माध्यमिक शाळेत आज रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी २०० हून अधिक रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रूग्णालय आणि राष्ट्रवादी काँग्रसे पार्टीच्या वतीने श्रीराम माध्यमिक शाळेत राष्ट्रीवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते मोफत महाशिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतिश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्ष डॉ. आश्विनी देशमुख, विलास पवार, श्रीराम माध्यमिक शाळेचे चेअरमन अशोक लाडवंजारी, प्रमोद बऱ्हाटे, सेवा दलचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन, वाल्मिक पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते. 

आज रविवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपार २ वाजेच्या दरम्यान आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबीरात सुमारे ५५० हून अधिक रूग्‍णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरात डॉ.नितीन पाटील, सुनिल माळी, डॉ. प्रशांत साठे, डॉ. मनोज पाटील, डॉ. पंकज महाजन, डॉ. सचिन इंगळे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. अनुश्री व्ही, डॉ. शाहीद खान, डॉ. वैभव गिरी, डॉ. अतुल सोनार, डॉ. शैलेजा चव्हाण, डॉ. स्वप्निल गिरी, डॉ. नयना पाटील, डॉ. श्रीराज महाजन, डॉ. समिर चौधरी, डॉ. तेजस पाटील, डॉ. निरज चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content