मेहरूण तलावात अनोळखी वृध्दाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलावात अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी व्यक्ती मयतस्थितीत आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील मेहरूण तलावात एका ६५ वर्षीय वयोवृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस कर्मचारी पोहेकॉ गफुर तडवी, मुदस्सर काजी, पोलीस मित्र समाधान नाईक, शहारुख दबंग, तौसिक शेख मुनाफ यांनी घटनास्थळी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वयोवृध्दाने आत्महत्या केल्याचा अंदाज एमआयडीसी पोलीसांनी वर्तविली आहे. मयताचा पंचनामा करून मृतदेह देवकर वैद्यकिय महाविद्यालयात नेण्यात आला. वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी मृत घोषीत केले. रात्री उशीरापर्यंत मयताची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.

Protected Content