Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह संघटनेतर्फे निदर्शने (व्हिडीओ )

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणांच्या विरोधात आज शासकीय कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशन अर्थात एमएसएमआरए या संघटनेने जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

दिल्ली येथे झालेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये कामगार संघटनाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दरम्यान २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणांच्या विरोधात जळगाव येथील महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशन अर्थात एमएसएमआरए या संघटनेने जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. श्रम संहिता रद्द करा, विक्री कर्मचाऱ्याचे कार्यान्वयन सुनिश्चित करा, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यावर जीएसटी शून्य टक्के करण्यात यावा, औषधांची ऑनलाईन विक्री बंद करा, औषध निर्माण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी विपणन वैधानिक संहिता करा आदी मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी शहर मनपा इमारतीसमोर, गणेश कॉलनी परिसर आणि बी.जे.मार्केट परिसरात कॉ. संदीप पाटील, अमोल कुलकर्णी, रवींद्र अहलुवालिया, सागर घटक, चंपालाल पाटील, चेतन पाटील, महेश चौधरी, मनीष चौधरी, दिनेश जगताप, विशाल चौधरी, राजेश पोतदार आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभा घेत मार्गदर्शन केले.

 

Exit mobile version