Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य असून जीवनाच्या सार्थकासाठी नामस्मरण करा – हभप महामंडलेश्वर आनंद सरस्वती

faizpur news 1

यावल प्रतिनिधी | हिरण्यकश्यपाने अमृताचे वरदान परमात्म्याकडे मागितली पण परमात्माने नृसिंह रूप धारण करून त्याचा वध केला. मृत्यू हे प्रत्येकाच्या जीवनाचे अंतिम सत्य आहे. मानवाने आपले जीवन सार्थक करण्यासाठी हरी नामात दंग राहोत व हरिनाम घेत राहावे, असे हभप १००८ महामंडलेश्वर आनंद सरस्वती, हभप सुर्यभान महाराज शेळगावकर, हिंदू संस्कृती संवर्धन राष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यांनी उपस्थित भाविक भक्तांना निरूपणात सांगितले. यावलच्या गंगानगरमध्ये संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हभप 1008 महामंडलेश्वर आनंद सरस्वती ह भ प सुर्यभान महाराज यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावल शहरातील गंगानगर कॉलनी परिसरातील संगीतमय मद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह कीर्तन सप्ताह सुरू असून, या सप्ताहाचे सात वर्ष पूर्ण करत आहे या सप्ताहाचा आज पाचवा दिवस असुन, तसेच रोज सकाळी आरती साडेपाच ते साडेसहा कथावाचन सकाळी 11 ते 2 व दुपारी तीन ते पाच होत आहे व विष्णुसहस्रनाम साडेसहा ते साडेसात हरिपाठ पाच ते सात दररोज आठ ते दहा कीर्तन पुढील प्रमाणे होत आहे. शनिवार हभप उदय महाराज डोंगर, कठोरा रविवार, मुकुंद महाराज पहुर, सोमवार नारायण महाराज निंभोरा, मंगळवार संजय शालिक महाराज मोहराळा, बुधवार सूर्यभान महाराज शेळगावकर, गुरुवार प्रतिभाताई पाटील सोनगीर, शुक्रवार पूजाताई पाडळ शेखर, शनिवार भरत महाराज म्हैसवाडी यांचे भक्तगण कीर्तन ऐकत आहे व भाविक भक्त मोठ्या संख्येने कीर्तनाचा लाभ घेत आहे तसेच यासाठी गायनाचार्य ह-भ-प कल्पेश महाराज धारशेरी, मृदंगाचार्य योगेश महाराज पाडळसे ,व सकाळी काकडा आरतीसाठी संमिश्र वारकरी टाळकरी मंडळी डोंगर कठोरा व पहारेकरी संमिश्र वारकरी मित्र मंडळ डोंगर कठोरा यांची या संगीतमय मद् भागवत कथा साठी साथ लागत आहे.

तसेच रविवार प्रविण महाराज मलकापूर कर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 3 ते 6 दिंडी सोहळा चे मिरवणूक सोहळा होणार आहे तसेच दिनांक २फेब्रुवारी रोजी सकाळी खंडेराव महाराज यांच्या तळी भरण्याचा कार्यक्रम व सायंकाळी महाप्रसाद व काल्याचे किर्तन सह सप्ताहाची सांगता होणार आहे. संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गंगानगर कॉलनी परिसरातील आयोजक मंडळांनी केले आहे.

Exit mobile version