Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मृत्यूनंतर ‘पॉझिटीव्ह’ सिध्द झालेल्या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर तो पॉझिटीव्ह असल्याचे सिध्द झाल्यानंतर आरोग्य यंत्रणांनी त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील सम्राट कॉलनीतील रहिवासी असणार्‍या ४० वर्षाच्या तरूणाचा आज दुपारी जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या आधीच त्याचा स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये हा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले. यामुळे आता त्या तरूणाच्या कुटुंबियांसह इतरांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या तरूणाच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही क्वॉरंटाईन करण्यात येणार असून आवश्यकता वाटल्यास त्यांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती कोविड रूग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version