Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मू.जे. महाविद्यालयात शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन

MJ College news

जळगाव प्रतिनिधी । कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित स्वायत्त मू.जे. महाविद्यालयात शैक्षणिक करारातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि संस्कृतभारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, पाच दिवसीय शिक्षणकौशल संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. विजयकुमार, प्रभारी कुलसचिव आणि अधिष्ठाता, व्याकरण विभाग, संचालक नियंत्रण विकास मंडल क.का.स.वि.रामटेक, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिक्षकांनी अध्यापनात कसे परिवर्तन करावे याविषयी डॉ.विजयकुमार यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ स. ना. भारंबे यांनी भूषविले. शिक्षकांनी उत्तम कौशल्य सम्पादन केल्यास विद्यार्थ्यांना भाषाज्ञान अतिशय उत्तमप्रकारे संपादित होऊ शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले. आणि सूत्रसंचालन प्रा. प्रीती शुक्ल यांनी केले. या प्रशिक्षणास श्रीश चिपळोणकर, आशिष सैतवाल, सीमा भारंबे करणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील २५ हून अधिक संस्कृत शिक्षक सहभागी झालेत. ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पाच दिवस चालणार आहे.

Exit mobile version