Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मू. जे. महाविद्यालयात एम.ए. एम.सी.जे.(प्रथम वर्ष ) प्रवेश सुरु..

 

जळगाव, प्रतिनिधी । के.सी.ई.सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त)  महाविद्यालय जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात एम.ए. एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश देणे सुरु आहे.

एम.ए. एम.सी.जे. अभ्यासक्रमाची युजीसी पॅटर्ननूसार पत्रकारिता आणि जनसंवाद रोजगाराभिमुख ,कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची पुर्नरचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, जनसंपर्क, जाहिरात, न्यू मीडिया, आकाशवाणी, जनसंपर्क कार्यालये, कॉर्पोरेट उद्योग, वृत्तपत्रे, एफ.एम.रेडिओ, सोशल मीडिया आदि क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध आहे. जनसंवाद आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी याकरिता एम.ए. एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी प्रवेश सुरु आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमाला पात्र असेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. संदीप केदार यांच्याशी संपर्क साधावा असे प्राचार्य सं.ना.भारंबे यांनी कळविले आहे.

Exit mobile version