Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी सेवानिवृत्त

WhatsApp Image 2020 02 01 at 6.05.46 PM

जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई सोसायटी संचालित मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी ३१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्तनिमित्त आयोजित सोहळ्यात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यात कार्यालयीन कर्मचारी नितीन पाटील, राजेश बागुल, कुलसचिव जगदीश बोरसे यांचा समावेश होता. यानंतर कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्यांना फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यात त्यांनी डॉ. उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्यपद्धतीविषयी तसेच एक सामान्य माणूस म्हणून किती मनमिळाऊ आहेत याबद्दल मत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले की, ते मू.जे.महाविद्यालयात पाच वर्षापूर्वी रुजू झालेत. हे महाविद्यालय आहेच पण त्याहीपेक्षा हे नंदनवन आहे. येथे आल्यावर मनाला दिलासा मिळतो असे बोलतांना त्यांना गहीवरून आले होते. महाविद्यालयातील आँटोनॉमस इन्चार्ज डॉ. स. ना. भारंबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीश बोरसे, प्रा. राजेश बागुल, प्रसाद देसाई, पी. पी. महाजन, प्रा. आरती गोरे, श्रीकृष्ण बेलोरकर, स्वाती संवत्सर, सुरेखा पालवे, डॉ. केतन नारखेडे, डॉ. योगेश महाले, सुभाष लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. के.सी.ई. सोसायटीच्या सर्व प्रमुखांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. अशोक राणे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ स. ना. भारंबे, प्रा. डॉ. गौरी राणे, डॉ. शिल्पा बेंडाळे, प्रा.करूणा सपकाळे, प्रा. बी. एन. केसुर, प्रा. कुमार रेड्डी, प्रा. डॉ. ए. पी. सरोदे तसेच डॉ. उदय कुलकर्णी सपत्नीक तसेच आदी मान्यवर उपस्थीत होते.

Exit mobile version