मूलभूत सुविधा न दिल्यास आंदोलन : संविधान रक्षक दल भीम आर्मीचा इशारा

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोराळे गावात सरपंच, ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराने सध्या गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असल्याच्या तक्रार ग्रामस्थ करत आहेत. या समस्या त्वरित न सोडल्यास संविधान रक्षक दल भीम आर्मीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बोराळे या गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेले सर्व लाईट बंद आहेत. गावात पाणी पुरवठा होतो,मात्र वार्ड क्रमांक एकमध्ये कमी प्रमाणात पाणी येते. या संदर्भात वेळोवेळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात,सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना सांगून सुद्धा कुठले ही प्रश्न मार्गी लागत नाही. त्याच बरोबर गावातील मुख्य रस्त्याजवळ गटारीची नियमित साफसफाई होत नसल्याने गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहून येत आहे. सांडपाणी गटारीत साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगार कर्मचारी नाहीत का ? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. नियमित स्वच्छता केल्यास गटारीत घाण साचणार नाही, ग्रामस्थांना स्वतः गटारीतील घाण. कचरा साफ करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यानागरी समस्याकडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थ तक्रार करीत आहेत.

दरम्यान, संविधान रक्षक दल भीम आर्मीचे यावल तालुका संघटक राजू वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , बोराळे गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होवून आज चार ते साडेचार वर्ष झालेले आहेत. मात्र. फक्त निवडणूक लढण्यासाठी गावात गल्ली बोळात फिरणारे ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यावर फक्त ग्रामपंचायतीच्या मासिक सभेसाठी गावात धुमकेतू सारखे चमकतात. ग्रामपंचायतीचे प्रश्न नागरिक ग्रामसभेत मांडतील म्हणून सदस्य ग्राम सभेच्या मीटिंगसाठी हजर नसतात म्हणून येत्या सात दिवसात जर ग्रामपंचायतीने प्रश्न मार्गी नाही लावले तर,संविधान रक्षक दल भीम आर्मी यावल तालुका युनिट, बोराळे ग्रामपंचायतीच्या समोर संविधानिक पद्धतीने आंदोलन छेडणार असा इशारा ही भीम आर्मी तालुका संघटक राजु वानखेडे यांनी दिला आहे.

Protected Content