Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु.जे. महाविद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात 28-29 मार्च, 2023 ला दोन दिवसीय इन्स्ट्रूमेंटल ट्रेनिंग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयक्युएसी संचालक, प्रा.के.पी. नारखेडे अध्यक्ष म्हणून लाभले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध इन्स्ट्रुमेंट IR spectroscopy, Atomic Absorption Spectroscopy, UV Visible spectroscopy, Gas chromatography, HPLC, Bio-activities विषयी व्याख्याने तसेच प्रात्यक्षिके घेण्यात आली.

 

सदर कार्यक्रमास  रसायनशास्त्र तसेच सूक्ष्मजीव शास्त्रच्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य सं. ना. भारंबे व  विभागप्रमुख डॉ. योगेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजनात सोनल उपलपवार, , डॉ. राजेंद्र. पाटील,  डॉ. जयश्री भिरूड, डॉ. मनोज पांडे, डॉ. वसीम शेख,  डॉ. राहुल महीरे, प्रा. संदीप पाडवी, प्रा. आरजु काझी, प्रा. ऐश्वर्या परदेशी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version