Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु. जे. त राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने शनिवारी विविध उपक्रम

 

जळगाव, प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या “जलश्री वॉटरशेड सर्व्हेलन्स अँड रिसर्च इंस्टीट्युट” तर्फे, शनिवार २९ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येणार आहे.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जैवविविधता उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवात लांडोरखोरी फॉरेस्ट गार्डन, जळगाव येथे पक्षी आणि फुलपाखरू जत्रेतून हा कार्यक्रम सुरू होईल. ज्यात उद्यानामध्ये सकाळी ७ ते सकाळी १० या वेळेत विद्यार्थ्यांना विद्यमान झाडे, वेली, पक्षी, फुलपाखरे इ. ओळख करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या विषय तज्ञांची एक टीम असेल. ही जत्रा सर्वसामान्यांसाठी खुली असेल. पक्षी मेळाव्या नंतर जैवविविधता दर्शविणाऱ्या स्टॅम्प प्रदर्शन (२५,000 हून अधिक स्टॅम्प  आणि चित्रकला स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालयात होईल. सकाळी ११. ३० वाजता प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेचे उदघाटन सोहळा होईल. जैवविविधतेचा खजिना आणि त्यासंबंधात जोडलेली तरुण पिढी जागरूक करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरून या पिढीचा सन्मान होऊ शकेल आणि भविष्यासाठी त्याचे जतन होईल. उपरोक्त कार्यक्रम हा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे समुदायाला पाण्याचे आणि जैवविविधतेचा विशेष उल्लेख असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांविषयी जनजागृतीसाठी केसीईएस, जलश्री वॉटरशेड सर्व्हेलन्स अँड रिसर्च इंस्टीट्युट, एम.जे. कॉलेज जळगाव करीता मंजूर करण्यात आला आहे. डॉ.स्वाती संवत्सर, प्राचार्य अन्वेषक म्हणून, तर  मिलिंद पंडित सह अन्वेषक म्हणून हा कार्यक्रम राबवणार आहेत.

Exit mobile version