Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लिम स्मशानभूमीत हायमस्ट लॅम्प बसवा – आमदार अनिल पाटलांकडे मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील रुबजी नगर बहादरपूर रस्त्यालगत खरोट कब्रस्तानात हायमास्ट  लॅम्प बसविण्यात यावा अशी मागणी मुस्लीम बांधवांनी आ. अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की,  खरोट कब्रस्ताना  मुस्लिम बांधवांची प्राचीन  स्मशानभूमी आहे. ती अमळनेर शहराच्या मध्यभागी आहे. सदर कब्रस्तानमध्ये रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार असतो. त्यामुळे दफनविधी करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  शिवाय अंत्यविधीसाठी आलेल्या आप्तेष्ट सगेसोयरे यांचीही गैरसोय होत असते. यासाठी आमदार खरोट कब्रस्तानासाठी आमदार निधीतून तीन हायमस्ट लॅम्पची सोय करून द्यावी असे निवेदन ह्युमन राईट्सचे तालुका प्रेसिडेंट नईम पठाण, इकबाल शेख व रुबजी नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष जाऊन आमदार अनिल पाटील यांना दिले आहे.

 

Exit mobile version