Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा काढा — खासदार साक्षी महाराज

 

कानपूर : वृत्तसंस्था । आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येणारे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, भारतात मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा, अशी मागणी करताना साक्षी महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.

‘पाकिस्तानहून अधिक मुस्लीम भारतात आहेत, त्यामुळे त्यांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा’, असं साक्षी महाराज यांनी बागपतमध्ये एका जाहीर कार्यक्रमात म्हटलंय.

पाकिस्तानची लोकसंख्या ३२ कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या २० कोटींपर्यंत पोहचलीय. असे ते म्हणाले ‘सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. पाकिस्तानची लोकसंख्या ३२ कोटी आहे. तर हिंदुस्तानात मुस्लिमांची संख्या २० कोटींपर्यंत पोहचलीय. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला जाणारा अल्पसंख्याक दर्जा तत्काळ प्रभावानं संपुष्टात यावा’ असं म्हणतानाच, ‘मुस्लिमांनी आता स्वतःला हिंदूंचं धाकटं भावंड समजून चालावं आणि देशात त्यांच्यासोबत रहावं’ असं वादग्रस्त वक्तव्य केलंय.

देशाच्या वाढत्या लोकसंख्येविषयी बोलताना, ‘वाढती लोकसंख्येच्या चाचणीसाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाणार आहे. ज्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना निवडणूक लढवण्यापासून बंदी घालण्यात येईल’ असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावरही टीका केली. ‘सरकार कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यास तयार आहे. राम मंदिराप्रमाणेच कॉंग्रेस आणि इतर विरोधी राजकीय पक्षांनी कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायला हवी आणि भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरून त्यांनी निशाणा धरू नये’ असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिलाय.

Exit mobile version