मुळजी जेठा महाविद्यालयात संविधान दिन साजरा

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.

एकूण दोन सत्रात कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संविधानाच्या प्रास्ताविकेला माल्यार्पण करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचे स्वरूप व संविधानातील महत्वाच्या घटना दुरुस्ती यावर सादरीकरण केले. गायत्री माळी व गुणवंत बोरसे या विद्यार्थ्यांनी अंत्यंत ओघवत्या स्वरूपात व रंजक पद्धतीने हे सादरीकण केले.

या सादरीकरणाच्या माध्यमातून संविधाना बाबतची दुर्मिळ माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात राज्यशास्त्र विभागाचे जेष्ठ प्राध्यापक संजय हिंगोणेकर यांनी “भारत: लोकशाहीची जननी” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळा प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांनी व्याख्यानास विशेष उपस्थिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे व प्रा. नम्रता महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कांचन पाटील या विद्यार्थिनीने कार्यकमाच्या दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन केले. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. भूषण धनगर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करुणा सपकाळे व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. एकूण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा भरघोस प्रतिसाद कार्यक्रमास लाभला.

Protected Content