Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून ; विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह !

पुणे (वृत्तसंस्था) करंज विहिरे( ता. खेड) येथील थोपटवाडी मधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. या मुलीचा मृतदेह निर्जन स्थळी विवस्त्र अवस्थेत आढळून आला. डोक्यात दगड घालुन निर्घृणपणे हा खून करण्यात आला आहे.

 

 

करंजीवहिरे येथील थोपटवाडीमधील आरती सोपान कलवडे (वय१७ ) या अल्पवयीन मुलीचा भामा आसखेड धरणाच्या कालव्याजवळ निर्जनस्थळी विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना मयत मुलीच्या घरापासुन सुमारे २०० मीटर अंतरावर घडली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत ४ संशयितांचे नावे देण्यात आली आहेत.

Exit mobile version