मुलींचे पंख छाटू नका – उमेश करोडपती यांचे आवाहन

पारोळा, प्रतिनिधी । दहावी-बारावीच्या निकालांमध्ये मुली ह्या वर्चस्व गाजवीत आहेत. त्या नेहमी पुढे येत आहे. परंतु, पालक मुलींना उच्च शिक्षण देण्यास उत्सुक नसल्याचे पाहावयास मिळते. त्यांचे पंख न छाटत त्यांना इच्छित उच्च शिक्षण व स्पर्धात्मक शिक्षणाकडे वळू द्या व गुणवत्तेला पुढे येऊ द्या असे सूचना वजा अहवान संस्थेचे अध्यक्ष उमेश करोडपती यांनी केले आहे.

डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालय च्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९०% वर गुण मिळविणारे ४८ विद्यार्थ्यांचा व पालकांचा शाळेच्यावतीने आज सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी श्री करोडपती हे बोलत होते. मुख्याध्यापक विजय बडगुजर, डॉ. चेतन कोरडपती, डॉ. सचिन करोडपती, श्रीकांत पाटील, एन. डी. पाटील, हेमंत पाटील हे यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते. उमेश करोडपती पुढे म्हणाले की, विद्यार्थी यशा मागे त्यांची मेहनत आई वडील संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन गुणवत्ता या साऱ्यांचा परिपाक असतो. यशस्वी विद्यार्थ्यांनी कुबड्या न घेता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन देशाची सेवा करावी. संस्थेने गुणवत्ता आणि संख्या या दोहावर परिश्रम घेत प्रगती गाठली आहे. व ती उंचावत राहील अशी अपेक्षा आहे. दरम्यान शाळेच्या तेजस्विनी पाटील या विद्यार्थिनीने ९६.८०% गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तर १५ विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या विषयात सर्वाधिक गुण मिळवुन शाळेचे नाव लौकिक केले आहे. या सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पालक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.प्रसंगी पालक म्हणून अर्चना भावसार, विश्वास चौधरी, नंदकिशोर बैरागी, राजेश पाटील यांनी तर विद्यार्थी मधून तेजस्वनी पाटील, मितेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रम सूत्रसंचालन वैशाली पाटील, विश्वास वाघ यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी साठी शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content