Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलाचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७) रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याच्या लक्षात आल्याने समोर आला. मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर आले नाही. शेजारी राहणाऱ्या तरूणानी धाव घेवून खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत उमेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Exit mobile version