Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरच्या महीला तहसीलदार बनल्या ‘कोरोना योद्धा’ ; गावो-गावी फिरून घेताय आढावा !

रावेर प्रतिनिधी । कोरोनासारख्या जिवघेणा वायरस पासुन बचावासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. अनेक प्रशासकीय, लोकप्रतिनिधी, नोकरी करणाऱ्या महिला गृहणी आपल्या कुटुंबासोबत घरात सुरक्षित वेळ घालवत आहे. परंतु रावेरच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे याला अपवाद आहे. त्या सकाळपासुन ग्रामीण भागात कोरोना संदर्भात नागरिकांना मास्क वापरा, घरात थांबण्याच्या सूचना देत भरउन्हात गावो-गावी फिरताय. तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी उषाराणी देवगुणे या कोरोनाशी एका सैनिकाप्रमाणे लढत आहे. यामुळे त्यांची आपल्या लहान मुलांची सायंकाळीच भेट होतेय.

कोरोना या संसर्गजन्य वायरस पासुन बचावासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका युध्दा प्रमाणे महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन, लढत आहे. यामध्ये महिला तहसिलदार उषाराणी देवगुणे यांची लोकांना कोरोनापासुन सुरक्षित ठेवण्याची धडपड अतुलनीय आहे. एक कर्तव्य दक्ष आई आणि तालुक्याच्या तहसिलदार असलेल्या उषाराणी देवगुणेची पहाट त्यांच्या मुलगा वर्धनच्या प्रश्ना पासुन सुरु होते. मम्मी आज केव्हा येणार ? याच उत्तर देतांना सौ. देवगुणे यांची रोज चांगलीच दमछाप होते. तहसीलदार यांचे पती नितिन दहीकर हे दिवसभर दोघ मुलांना त्यांची आई घरी येईल तोपर्यंत सांभाळ करतात. सकाळी १० वाजेपासुन भर-उन्हात सौ. देवगुणे तालुक्यातील गावो-गावी फिरतात स्वत: लोकांना माइकद्वारे घरात रहा, सुरक्षित रहा, माक्स बांधण्याच्या सूचना करतात.

 गावात जातांना एखाद्या शेतात कामच्या शोधात आलेले कुटुंब दिसले की, गाडी थांबवुन गाडीत ठेवलेले धान्याचे किट्स त्या गरीब कुटुंबाना देतात. परंतु गावातून त्यांची गाडी गेली म्हणजे स्थिती जैसे-थे सारखी होते. अनेक लोक घराबाहेर येऊन गप्पा मारतात त्यांना कोरोना वायरसची जणू गांभीर्य दिसत नाही तर इकडे तहसिलदार दुपारी १ वाजेच्या दरम्यान तहसिल कार्यालयात येऊन लोकांनाच्या प्रलंबित समस्या धान्य वाटप वैगरे समस्या सोडवतात. गरीब कुटुंबापर्यंत धान्य पोहचविण्यासाठी स्वत: लक्ष ठेवूण असतात. गरीब जनतेच्या जेवनाची व्यवस्था करता-करता स्वत:च्या जेवनाचे सुध्दा भान त्या विसरून जातात. एकीकडे कोरोनाच्या भीतीपोटी अनेक महिला आपल्या मुलां सोबत घरातच राहणे पसंत करतात, परंतु याला वर्धनची कर्तव्य दक्ष आई उषाराणी देवगुणे अपवाद आहे. त्या संकटकालीन स्थितीत लोकांसाठी कोरोनाशी एका योध्दा सारख्या लढत असून रोज सायंकाळी घरी जातांना त्यांना वर्धनच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या सोबत घेऊन घरामध्ये जावे लागते.

Exit mobile version