Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मुलांसाठीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळणार असल्याची शक्यता आहे, असे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

 

देशात  दुसरी लाट ओसरत असतांना   तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.   तिसर्‍या लाटेबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते,  तिसरी लाट लवकरच भारतात येऊ शकते. तसेच या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे.

 

डॉ. गुलेरिया म्हणाले, “कोव्हॅक्सिनच्या फेज II आणि III च्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.”

 

एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. १२ मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज II आणि III चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

 

तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वात जास्त प्रभावित होतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी पुढील लाटेत लहान मुलं संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे.

 

Exit mobile version