मुलभूत सुविधांसह विविध समस्या तातडीने सोडवा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली गावात अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. वारंवार मासिक सभेत तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या. परंतू याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. नागरीकांच्या मुलभूस सुविधांस विविध समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केले आहे.

यावल तालुक्यातील विरावती गावातील वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. यात गटारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे. विरावली गावातील मुख्य रस्त्याचा गटारीवरील धापे ५ ते ६ महिन्यांपासून तुटलेला आहे. यामुळे वाहनांचा लहान मोठा अपघात होत आहे. गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंडची अवस्थता झाली आहे. यामुळे आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. १५ वित्त आयोग निधीतून खालचे गावात फ्लेवर ब्लॉक बसवणे. मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे यासह अनेक समस्यांचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे. शिवाय वार्ड क्रमांक २ मध्ये सार्वजनिक मुतारी, सांडपाण्याचा निचरा, नाल्याचे खोलीकरण, नाल्यातील गाळ काढणे आदी समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून सुविधा व समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य ॲड देवकांत पाटील यांनी सरपंच, सचिव ग्रामपंचायत विरावली यांना निवेदनातून केला आहे.

Protected Content