Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुनदेवी मातेचे मंदीराच्या परिसरातून सामानांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील नांद्रा रस्त्यावर मुनदेवी मातेचे मंदीराच्या परिसरातून सीसीटीव्हीचे डीव्हीआरसह इतर सामान असा एकूण ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी बुधवार २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील नांद्रा रस्त्यावर मनुदेवीचे मंदिर आहे. बुधवारी २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री मंदिराच्या बाजूला असलेल्या मार्बलच्या रॅकमधून सीसीटीव्ही डीव्हीआर व इतर साहित्य असा एकूण ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात लीलाधर अरुण सपकाळे (वय-४२) रा. भवानीनगर, कानळदा ता. जि. जळगाव यांनी बुधवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल तायडे करीत आहे.

 

Exit mobile version