Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्याध्यापक पुरूषोत्तम गड्डम यांना पीएचडी प्रदान

बोदवड, प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील एणगाव जी.डी.हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम संभाजीराव गड्डम यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीद्वारा नुकतीच मानद पीएचडी पदवी नागपूर येथे आयोजित दीक्षांत सोहळ्यात प्रदान करण्यात आली. 

या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद दहिवले  होते. या कार्यक्रमात पुरुषोत्तम गड्डम यांना सन्मानपूर्वक हि पदवी प्रदान करण्यात आली. “मराठी अखबारोमे नियमित प्रकाशीत होनेवाले स्तंभलेख और सामाजिक उपयोगिता” या विषयावर गड्डम यांनी हिंदी भाषेतून प्रबंध सादर केला होता. मराठी वर्तमानपत्रातून गेल्या अनेक वर्षांपासून  पुरूषोत्तम गड्डम स्तंभलेखन करीत आहेत. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी संपादकीय लेख आणि स्तंभलेखन किती प्रभावी ठरतात, यावर प्रबंधात प्रकाश टाकला आहे. डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आल्यानंतर अनेकांनी शुभेच्छा देत,अभिनंदन केले.

 

Exit mobile version