Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, शिवसेनाही थाटामाटात कार्यक्रम घेणार : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार असून शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी 1 कोटी रुपये पाठवल्याची माहिती दिली आहे.

Exit mobile version