Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्त विद्यापीठ परीक्षा : मंगळवारपासून यावल केंद्रावर प्रक्रियेस प्रारंभ

यावल, प्रतिनिधी ।   यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वार्षिक परीक्षा यावल येथे कला वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार १० ऑगस्ट पासून प्रारंभ होत असल्याचे केंद्र प्रमुखांनी कळविले आहे.

 

 

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,   मुक्त विद्यापीठाचे केंद्र 5388A मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष२०२०व२१ ची वार्षिक परीक्षा एफ. वाय., एस. वाय., टी. वाय. बी.ए. , बी. कॉम या वर्गाची दिनांक १० / ०८ / २०२१ पासून सुरू होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षे करिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या http://ycmou.unionline.in या वेबसाईटवर ती क्लिक करुन लॉग इन करावे. लॉग इन करण्यासाठी आपला सोळा अंकी (PRN) पी. आर. एन.टाकावा. पासवर्ड म्हणजे आपली जन्मतारीख YY DD MM या स्वरूपात टाका. पासवर्ड टाकल्यानंतर सिलेक्ट ॲक्टिव टेस्ट वरती क्लिक करून दिलेल्या तारखेनुसार विषयाचा कोड नंबर निवडून क्लिक करा. विषय निवडल्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा व बाकी पूर्ण माहिती ग्रुप वरती टाकण्यात आली आहे. असे महाविद्यालयातील प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी कळविले आहे. काही अडचण आल्यास पुढील  दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावे. प्रा. ए. पी. पाटील  केंद्र संयोजक 9860366515,  संतोष ठाकूर  केंद्र सहाय्यक 9890247153, मिलिंद बोरघडे कनिष्ठ सहाय्यक 7387411299 असे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version