Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट

मुक्ताईनगर : बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र आपेगाव संस्थान यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.

भाऊबीजेच्या दिवशी संत मुक्ताबाईला साडी चोळी परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती. ह्यावेळी संत मुक्ताबाई रविंद्र हरणे महाराज यांच्यासह जिजाभाऊ मिसाळ यांनी सहपत्निक संत मुक्ताईची पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली.

यावेळी कार्यक्रमाला मुक्ताई संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, किशोर खोडपे, ईश्वर रहाणे, विवेक कुमावत, ईश्वर चोरडिया, एकनाथ नरके,दिलीप राव लांडगे,राम पाटील आऊटे, भाऊसाहेब आउटे, लक्ष्मणराव आऊटे,माऊली मूळे,पंडित राव आऊटे,राजेंद्र वाघ,तात्यासाहेब मोरे,ज्ञानेश्वर मिसाळ,मनोहर थोरात,विठ्ठल नरके,संकेत मिसाळ, नवपुते महाराज,सतीश महाराज,योगेश सोन्ने.तसेच मुक्ताई व आपेगाव येथील संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते.

Exit mobile version